खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत मुत्ररोग निदान व " />
सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला तालुका व आसपासच्या नागरिकांसाठी सांगोला शहरातील कडलास रोडवरील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये मुत्ररोग निदान व शस्त्रक्रिया उपचार उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती डॉ. परेश खंडागळे यांनी दिली.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना मोफत औषधोपचार व शस्त्रक्रियेची सोय उपलब्ध असून मुत्ररोग, प्रोस्टेट ग्रंथीची सूज, मुतखडा, मूत्राशयाचे आजार, किडनीचे आजार, किडनीतील खडे, मूत्रवाहिनी मधील खडे आदीवर उपचार करण्यात येत आहेत.
'पांढरे, केसरी व पिवळे रेशन कार्डधारकासाठी मोफत योजना असून रेशन कार्ड, आधारकार्ड, बँक पासबुक, जन्माचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी ७५८८५०६१९६, ८९९९६११६२२ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.
तरी गरजू रुग्णांनी मुत्ररोग निदान शस्त्रक्रियेच्या उपचाराचा लाभघ्यावा, असे आवाहन डॉ. परेश खंडागळे यांनी केले आहे.