पोलिस...पोलिस....पोलिस...

सांगोला पोलिसा" /> पोलिस...पोलिस...पोलिस....

IMG-LOGO
Home क्राईम पोलिस...पोलिस...पोलिस....
क्राईम

पोलिस...पोलिस...पोलिस....

September 2021 84 Views 0 Comment
IMG

पोलिस...पोलिस....पोलिस...

सांगोला पोलिसांनी चोरटी वाळू वाहतूक करणारा पीकअप पकडला...

सांगोला (तालुका प्रतिनिधी): विनापरवाना वाळू उपसा करून वाहतूक करणारा पिकअप पकडून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी 50 हजार रुपये किमतीचा पिकअप, 2 हजार रुपयांची वाळू असा मुद्देमाल जप्त करून बाबासो आनंद इंगोले व चंद्रकांत सिद्धेश्वर इंगोले दोघेही रा.कोपटेवस्ती, सांगोला यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

    सांगोला पोलीस ठाण्याचे सपोनि काटकर व पोकॉ सुनील लोंढे सरकारी वाहनाने चांडोलेवाडी परिसरात गस्त घालीत असताना समोरून बिगर नंबरचा पिकअप येताना दिसला. संशय आल्याने पोलिसांनी चालकास पिकअप थांबविण्यास सांगून चालक बाबासो आनंद इंगोले व चंद्रकांत सिद्धेश्वर इंगोले दोघेही रा.कोपटेवस्ती, सांगोला यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी माण नदीपात्रातून सदरची वाळू आणली असून त्याची रॉयल्टीची पावती नसल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी 50 हजार रुपये किमतीचा पिकअप, 2 हजार रुपयांची वाळू असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोकॉ सुनील लोंढे यांनी वरील दोघांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.