सांगोला विद्यामंदिरमध्ये NMMS शिक्षकांचा सत्कार संपन्न

 " /> सांगोला विद्यामंदिरमध्ये NMMS शिक्षकांचा सत्कार संपन्न

IMG-LOGO
Home शैक्षणिक सांगोला विद्यामंदिरमध्ये NMMS शिक्षकांचा सत्कार संपन्न
शैक्षणिक

सांगोला विद्यामंदिरमध्ये NMMS शिक्षकांचा सत्कार संपन्न

April 2025 64 Views 0 Comment
IMG

सांगोला विद्यामंदिरमध्ये NMMS शिक्षकांचा सत्कार संपन्न

 

सांगोला (वार्ताहर)

सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या 108 विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षा 2024-25 मध्ये शिष्यवृत्ती संपादन करत उत्तुंग यश मिळवलेबद्दल माजी प्राचार्य लक्ष्मणराव जांगळे आणि भिमाशंकर पैलवान, सेवानिवृत्त प्रयोगशाळा परिचर पांडूरंग भुईटे सर यांनी संस्थाध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके सर, प्राचार्य अमोल गायकवाड सर, विभाग नियंत्रक प्रदीप धुकटे सर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व मार्गदर्शक शिक्षकांचा अभिनंदनपर सत्कार केला.

 यावेळी मनोगत व्यक्त करताना संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब यांच्या शिस्तपूर्ण मार्गदर्शनाखाली गुणवत्तेचा आलेख दिवसेंदिवस उंचावत राहो अशी सदिच्छा माजी प्राचार्य भिमाशंकर पैलवान आणि लक्ष्मणराव जांगळे यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना आम्ही तिघेही सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे माजी विद्यार्थी असून प्रशालेच्या स्थापनेपासून गुरुवर्य कै.चं.वि.तथा बापूसाहेब झपके आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी अंगीकारलेल्या "विद्यार्थी प्रथम" या तत्त्वाने आजही सर्व शिक्षक कार्यरत असल्याचा आम्हास अभिमान असून त्यांचे कौतुक करून पाठीवर शाब्बासकीची थाप देण्याजोगे जिल्ह्यात अव्वल असे "शंभरीपार यश" केवळ या शिक्षकांच्या श्रमातून आज या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहे.

विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण, सर्वंकष आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी आज संस्था-पदाधिकारी, प्रशासन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पूर्ण क्षमतेने कार्यरत असणारी जिल्ह्यात एकमेव संस्था अशी ओळख आपल्या शाळेने निर्माण केली असून या शाळेचा माजी विद्यार्थी, शिक्षक ते माजी प्राचार्य इथपर्यंतच्या जीवन प्रवासाने आम्ही कृतार्थ आहोत अशी सद्भावना यावेळी माजी प्राचार्य द्वय भिमाशंकर पैलवान आणि लक्ष्मणराव जांगळे यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी संस्था व प्रशाला बाह्य परीक्षा विभाग प्रमुख नामदेव खंडागळे, वैभव कोठावळे, NMMS विभाग प्रमुख निलेश जंगम यांच्यासह मार्गदर्शक शिक्षक राजेंद्र ढोले, मनीषा पांडे, सिताराम राऊत, शितल कांबळे, रोहिणी शिंदे, कविता राठोड, विनीत चिकमने, शिवानंद लोखंडे, दिग्विजय चव्हाण, भारती गयाळी, सविता गायकवाड, अजित मोरे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपमुख्याध्यापिका सौ.शाहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, मच्छिंद्र इंगोले यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.