सांगोला प्रतिनिधी
सांगोला तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालल्यामुळे पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याचे टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी यांना टेंभू सिंचन योजनेतून माण नदीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकासाठी उन्हाळी सिंचन आवर्तन लवकरात लवकर सोडण्याची आग्रही मागणी केली. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला असून त्यामुळे तालुक्यातील गावांना शेती पिकासाठी सिंचन उपलब्ध करून नियोजनबद्ध पद्धतीने आवर्तन लवकरात लवकर सोडण्यात यावे अशी आग्रही मागणी केली. परंतु सांगोल तालुक्याच्या हक्काचे पाणी सांगोल्याला मिळत नव्हते यांचे प्रयत्न अपुरे पडत होते. असे असताना सांगोला तालुक्यामध्ये मंगळवार रात्री साडेआठ ते दहा च्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणीच पाणी झाले.तात्पुरत्या स्वरूपात का होईना गारवा निर्माण झालेला आहे आजच्या घडीला जाणवलेले पाणीटंचाई व चारा टंचाई चे संकट चार-आठ दिवस का होईना पुढे गेलेले आहे ,अशी भावना शेतकऱ्यांनी दैनिक सांगोला सुपरफास्ट शी बोलताना व्यक्त केली.
विद्यमान आमदार आणि खासदार लोकप्रतिनिधी आजी-माजी लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी प्रयत्न करूनही सांगोला तालुक्याला पाणी सोडण्यास अपयश आलेले आहे निसर्गाच्या कृपेमुळे सांगोला तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस झाला यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सांगोला तालुक्यामध्ये शेतीवर उपजीविका करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्याचबरोबर दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याचा व जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न उन्हाळ्यामुळे उद्भवत होता.वेळोवेळी लोकप्रतिनिधींना भेटून मान नदीमध्ये उन्हाळी आवर्तनाची पाणी सोडण्याचे संदर्भात निवेदन देऊन भेटून सांगितले. नेहमीच सांगोला तालुक्यावर पाणी सोडण्याच्या संदर्भात अन्याय होत आलेला आहे. आज त्या अन्यायाला निसर्गाने चोख उत्तर दिलेले आहे.सांगोला तालुक्यामध्ये पडलेल्या पावसामुळे तात्पुरत्या स्वरूपात गारवा निर्माण झाला आहे व पाणीटंचाईची समस्या चार आठ दिवस लांबणीवर पडलेले आहे. परंतु सांगोला तालुक्याला उन्हाळी आवर्तनात मिळणारे टेंभूचे पाणी मिळावे ही आग्रही मागणी आमची आज ही तशीच आहे.
संतोष पाटील
शेतकरी नेते
सांगोला.