IMG-LOGO
Home सामाजिक संगम ब्रँन्डी हाऊस या दुकानास नगरपालिकेची कोणतीच ना-हरकत, परवानगी नसताना दुकान चालु
सामाजिक

संगम ब्रँन्डी हाऊस या दुकानास नगरपालिकेची कोणतीच ना-हरकत, परवानगी नसताना दुकान चालु

May 2025 39 Views 0 Comment
IMG

संगम ब्रँन्डी हाऊस या दुकानास नगरपालिकेची कोणतीच ना-हरकत, परवानगी नसताना दुकान चालु

 

वाईन शॉप दुकान बंद करण्याची तात्काळ कार्यवाही करण्याची अँड .रोहित सोनवणे यांची सांगोला नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांचेकडे लेखी तक्रारीव्दारे मागणी

 

सांगोला : सांगोला शहरातील जुनी स्टेट बँकेजवळ, स्टेशन रोडवर असलेल्या संगम ग्रॅन्डी हाऊस हे सरकारमान्य वाईन शॉप पूर्वी महात्मा फुले चौक परिसरात होते, परंतू मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हे वाईन शॉप राष्ट्रीय महामार्ग व राज्यमहामार्ग पासून ५०० मीटर अंतराच्या आतमध्ये येत असल्याने ते राज्य उत्पादन शुल्क विभागाने बंद केले होते. त्यानंतर हे वाईन शॉप सांगोला शहरातील स्टेशन रोडवरील जुन्या स्टेट बँकेजवळील जागेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. मात्र सदरील वाईन शॉप महात्मा फुले चौक येथून स्टेशन रोडवरील जुन्या स्टेट बँकेजवळ स्थलांतरीत करताना कायदेशीर प्रक्रिया व शासकीय नियमाप्रमाणे सदरील दुकानास व्यवसाय करणेकरिता नगरपालिकेची कोणतीही ना-हरकत, परवानगी घेतली नसल्याचे माहिती अधिकार अर्जातून निष्पन्न झालेले आहे. सदरील दुकानदाराने नगरपालिकेच्या कोणत्याही कागदोपत्राची व नियमांची पुर्तता केलेली नाही.

संगम बँन्डी हाऊस, जुन्या स्टेट बँकेजवळ, स्टेशन रोड, सांगोला या वाईन शॉपच्या दुकानास शासनाच्या नियमांनुसार सांगोला नगरपालिकेच्या ना-हरकत, परवानगी नसल्याने सदरील वाईन शॉपचे दुकान बंद करण्याची तात्काळ कार्यवाही करावी अशी लेखी तक्रार अॅड. रोहित सोनवणे यांनी सांगोला नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या कडे केलेली आहे.